15 December 2024 8:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

हिंदू धर्म संकटात आहे हा भाजपाचा जुमला असल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट | भाजपवर 302 खाली गुन्हा नोंदवा

Hindu Khatre Me Hai

मुंबई, २४ सप्टेंबर | हिंदू धर्माला कोणताही धोका नसून हिंदू धर्माला धोका असल्याच्या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत’ असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. नागपूरमधील कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाऱ्याला प्रतिसाद देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील हिंदू धर्माला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी जबलपुरे यांनी आरटीआयद्वारे देशातील हिंदू धर्माला धोका असल्याचा पुरावा गृहमंत्रालयाकडे मागितला होता. आणि गृहमंत्रालयाकडे तो पुरावा आहे, असा त्यांनी दावा केला होता.

हिंदू धर्म संकटात आहे हा भाजपाचा जुमला असल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट, भाजपवर 302 खाली गुन्हा नोंदवा – Threats to Hinduism imaginary says Union home ministry to RTI reply :

एका महिन्यानंतर गृह मंत्रालयाचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी वी. एस. राणा यांनी हिंदू धर्माला कथित धमक्या संदर्भात कोणतीही माहिती किंवा पुरावा उपलब्ध नाहीये, असे स्पष्ट केले आहे. कोणत्या धर्माला किती धोका आहे? हे ओळखण्यासाठी गृहमंत्रालय अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे कोणतेही रेकॉर्ड ठेवत नाही. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय या बाबतीत पूर्ण माहिती देण्यासाठी सक्षम नाहीये असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेसने त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदू खतरे में है हा जर जुमला होता तर या प्रकरणी भाजपवर 302 खाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. “हिंदू धर्म संकटात आहे” हा भाजपाचा जुमलाच होता हे स्वतः अमित शहांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या भयानक जुमल्यातून भाजपाने सत्तेसाठी विद्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात मॉब लिंचिंग झाले, हत्या झाल्या. त्याबद्दल भाजपा नेत्यांवर 302 चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Threats to Hinduism imaginary says Union home ministry to RTI reply.

हॅशटॅग्स

#SachinSawant(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x