23 August 2019 12:02 AM
अँप डाउनलोड

माढा संदर्भात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली अमित शहांची भेट

माढा संदर्भात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : एनसीपीचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या भेटी दरम्यान महाराष्ट्रात गाजत असलेल्या नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित प्रश्नावर महत्वाची चर्चा झाल्याचं खासदार नाईक निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाच्या ऑफिसमध्ये मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विकास कामाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करत एक निवेदन दिले आहे. दरम्यान माढा मतदारसंघातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित कामे तसेच फलटण बारामती व फलटण पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं देखील नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

अमित शहा यांनी माढा मतदारसंघातील विविध कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल आहे. मतदारसंघातील दुष्काळी तालुक्यांचा दुष्काळ कायम स्वरुपी पुसण्यासाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही अमित शहा यांनी दिल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Amit Shah(149)#BJPMaharashtra(186)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या