22 August 2019 11:57 PM
अँप डाउनलोड

विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील: संजय राऊत

विरोधक मनसेलाचं नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील: संजय राऊत

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पायउतार करण्यासाठी कॉंग्रेसकडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाल केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने कॉंग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या काँग्रेस आघाडीतील सहभागावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता, राज्यातील विरोधी पक्ष केवळ कागदावर उरलेला असून विरोधक मनसेलाच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सोबत घेतील. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या पीकविमा मोर्चावर विरोधक टीका करत आहेत, परंतु राज्यातील विरोधी पक्षावर जनतेचा जराही विश्‍वास उरलेला नाही. विरोधी पक्ष कुचकामी बनले आहेत. त्यांनी आमच्यावर टिका करण्यापेक्षा मोर्चा का काढला नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच आजवर शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाविषय लढत आली आहे. या पुढे देखील लढत राहील, असंही ते म्हणाले.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या