26 May 2022 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कळलं का ? उद्योगपती व उद्योगपती प्रशाकीय अधिकारी, सगळंच सोपं झालं

मुंबई : नुकताच मोदी सरकारने खासगी क्षेत्रातील मोठ्या पदावरील व्यक्तींना प्रशासकीय सेवेचे दालन यूपीएससी परीक्षा न देता सुद्धा काबीज करता येईल असा गाजावाजा करत एक निर्णय प्रसिद्ध केला. परंतु त्यामागचं वास्तव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अचूक पकडलं असून तेच व्यंगचित्रातून मार्मिक पणे दाखवून दिल आहे.

मोठ्या मेहनतीने जे विद्यार्थी प्रशासकीय सेवेसाठी दिवस रात्र अभ्यास करून IAS अधिकारी होतात. त्यांच्यावर कुरघोडी करत खासगी क्षेत्रातील मोठ्या पदावरील लोक यूपीएससी परीक्षा न देता थेट प्रशासकीय अधिकारी होणार असल्याने उद्योगपतींची चांगलीच मजा होणार असल्याचं या व्यंगचित्रात मार्मिक पणे दाखविण्यात आल आहे. एक प्रकारे मोदी सरकारने उद्योगपतींसाठीच हा डाव आखल्याचे बोललं जात असून, अशा प्रकारे खासगी क्षेत्रातील मोठ्या पदावरील अधिकारी हे त्याच उद्योगपतींचे लोक असू शकतात अशी भीती काही प्रशासकीय अभ्यासाचे जाणकार बोलू लागले आहेत.

तसेच राज ठाकरेंनी याच व्यंगचित्रात संभाजी भिडेंच्या ‘त्या’ मायावी आंब्यावर वर सुद्धा मार्मिक पणे बोट ठेवलं आहे.

काय आहे ते व्यंगचित्र;

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x