7 July 2020 8:48 PM
अँप डाउनलोड

पु. ल. देशपांडेंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही: राज ठाकरे

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ असं करण्यात आलं असून, त्याच चित्रपटाचा काल राज ठाकरे यांच्या हस्ते पोस्टर लाँच करण्यात आला, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘भाईंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही. मला आतापर्यंत मोजक्याच बायोपिक भावल्या असतील. त्यात रिचर्ड अॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट, जो मी कॉलेजला दांडीमारून प्लाझा चित्रपटगृहात जवळजवळ १५० वेळा पहिला आहे, इतक ह्या सिनेमाने मी भारावून गेलो होतो.

पुढे ते म्हणालो की, महेश मांजरेकर हे सुद्धा ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट त्याच तोडीचा बनवतील. दिग्दर्शक महेश मांजरेकर हे पु. ल. आणि प्रेक्षक यांच्यामधील पूल यशस्वीपणे बांधतील,’ असा ठाम विश्वास व्यक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारणार आहेत. या चित्रपटात पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश असल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x