12 December 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

जिथे नातेवाईक मृतदेहाजवळ जातं नाहीत, तिथे तिने ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले

Corona Virus, Covid 19, Mumbai Police

मुंबई/पुणे, २१ मे: महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे एकाच दिवशी तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत.

मुंबई पोलिसमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील पार्कसाइट पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कान्स्टेबल गणेश चौधरी (वय-57) यांची कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही अधिकारी ‘हाय-रिस्क एज-ग्रुप’मध्ये होते. त्यामुळे दोघे एप्रिलपासून रजेवर होते.

दुसरीकडे, पुण्यात कोरोनाने आणखी एका पोलिसाचा बळी घेतला आहे. खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना 42 वर्षीय पोलिसाचा मृत्यू झाला आहे. वाहतूक विभागात ते रूजू होते. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहेत.

एवढं घडत असताना देखील पोलिसांची दुसरी आणि भावनिक बांधनीलकि जपणारी बातमी देखील समोर आली आहे. शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवले असताना, याच पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार संध्या शीलवंत यांनी कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जोपासत एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. सामाजिक बांधिलकीची जाणीव असली की, भीतीचे दरवाजेही बंद होतात, असे त्यांनी सांगितले.

मृतदेहांची नोंद करण्याचे कामकाज म्हणून काम करणाऱ्या पोलिसांमध्ये महिला पोलीस बेवारस मृतदेहाची नोंद करत, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. अखेर त्याच त्यांचे नातलग बनून अंत्यसंस्कारही करत आहेत. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील मृतदेहाशेजारी सुरू असलेल्या उपचाराच्या व्हिडीओने सर्वांनाच सुन्न केले. त्याचदिवशी संध्या यांनी ४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यात एक कोरोनाबाधित मृतदेहाचाही समावेश होता. जिथे नातेवाईकही कोरोनाच्या मृतदेहाजवळ जायला घाबरतात तिथे लॉकडाउनच्या काळात त्यांनी एकूण ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून त्या आपली जबाबदारी खंबीरपणे पेलत आहेत.

 

News English Summary: There is also news that the police have another emotional bond. While everyone was shocked by the death of Assistant Inspector of Police at Shahunagar Police Station, Sandhya Shilwant, a female police officer of the same police station, went beyond her duty and cremated 4 unclaimed bodies on the same day.

News English Title: corona virus Mumbai 4 bodies cremated same day women police News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x