28 June 2022 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले

Mumbai Dabbewala, Raj Thackeray, CM Uddhav Thackeray, Mumbai local Train

मुंबई, ३० सप्टेंबर : राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत.

दरम्यान राज्यात अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार आहे. लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिला आहे.

लोकलमधून प्रवासाची परवानगी नसल्यानं मुंबईतील डबेवाल्यांना आर्थिक प्रश्नांसह अनेक समस्यांना सामोर जावं लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात होती. अखेर ऑक्टोबरमध्ये डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले आहेत.

मुंबईचे पाच हजार डबेवाले दररोज सहा लाख चाकरमान्यांना डबा पोहोचवण्याचे काम करतात. विरार ते चर्चगेट, कल्याण ते सीएसएमटी आणि पनवेल अशा तिन्ही मार्गावर डबे पोहोचवणारे हे डबेवाले, मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवेवर बहुतांश अवलंबून आहेत. परंतु, लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचा व्यवसाय अजून बंद आहे. यासंदर्भात वारंवार मागणी केली जात होती. राजकीय नेत्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता.

काही दिवसांपूर्वी डब्बेवाला संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन लॉकडाउन दरम्यान निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची त्यांना कल्पना दिली होती. तसेच या प्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी देखील होती. त्यानंतर आजच्या अनलॉक ५ मध्ये डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले आहेत.

 

News English Summary: Due to the corona, public life has been disrupted and due to non-availability of travel by local train, the Mumbai Dabbewala in Mumbai are facing many problems including financial problems. Therefore, the state government was demanding permission to travel by local. Finally, in Unlock 5, the doors of the Mumbai Locals are open for Mumbai Dabbewala.

News English Title: Mumbai Dabbewala raised problems Raj Thackeray CM Uddhav Thackeray allowed travel local Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x