6 May 2021 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी
x

राज्य सरकार व जनतेच्या एकत्रीत प्रयत्नांना यश येतंय | कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमालीची घट

Maharashtra corona pandemic

मुंबई, २७ एप्रिल | महाराष्ट्राला एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की आज (२६ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल 71 हजार 736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून, सोमवारी सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. मंगळवारी लसीकरणाच्या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

लसीकरणात महाराष्ट्र देशात सतत अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होते. उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

मात्र, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे. पुणे शहरातही हा बदल बघायला मिळाला आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

 

News English Summary: The good news is that today (April 26) there is a sharp decline in the number of coronaviruses in the state. There was an increase of 48,700 corona patients in the state today. Another piece of good news is that the number of people who have been released from the corona today is huge. As many as 71,736 corona-affected patients have been released from corona in the state.

News English Title: The good news is that today there is a sharp decline in the number of coronaviruses in the Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1341)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x