12 April 2021 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सिंधुदुर्गात आगीच थैमान, काजूबागा आणि कलमे जळून भस्मसात.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही दिवसांपासून सिंधुदुर्गात काजू आणि आंबा बागांमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले असून, त्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.

अंदाजित आकडेवारीनुसार जवळजवळ १,००० कलमं जाळून खाक झाल्याचे समजते. या अग्नितांडवात एकूण ४० एकर वरील हजारो कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे या अग्नीतांडवावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक सरकारी यंत्रणा आगीचे कारण लवकरच स्पष्ट करतील असं कळवण्यात आलं.

हॅशटॅग्स

#Konkan(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x