महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल
मुंबई, १८ मे: महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे सीआरपीएफ आणि केंद्र सरकारच्या अखात्यारीतील इतर अर्धसैनिकी दलाच्या २० तुकड्या मागविल्या होत्या. त्यापैकी ५ तुकड्या दिल्लीहून निघाल्या आहेत. आज रात्री त्या मुंबईत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीआरपीएफच्या ३ तुकड्या आणि सीआयएसएफ २ तुकड्यांचा समावेश आहे.
या प्रत्येक तुकडीमध्ये १२० जवान आहेत. त्यामुळे पाच तुकड्यांमध्ये ६०० जवान असतील. येत्या २५ मे रोजी साजरा होणार्या रमजान ईद सणाच्या वेळी महाराष्ट्रातील मुस्लीम बहुल विभागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी या केंद्रीय अर्धसैनिकी दलावर असणार आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, मालेगाव, पुणे, कोल्हापूर, नागपूर, भिवंडी, पुणे, सोलापूरसहीत मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, नागपाडा, भेंडी बाजार, वांद्रे, कुर्ला, सांताक्रुज अशा विविध भागांमध्ये या केंद्र सरकारच्या अर्ध सैनिकी दलांना तैनात ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यात लष्कराला पाचारण केलं जाईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच फेटाळून लावली होती. पण कोरोनामुळे ताण आल्याने थकलेल्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्याचनुसार निमलष्करी दलाच्या २० कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. ज्या आधारे आता राज्यात आता हे चित्र पाहायला मिळत आहे.
News English Summary: The Maharashtra government had called for 20 units of CRPF and other paramilitary forces under the central government. 5 of them have left Delhi. She is expected to arrive in Mumbai tonight. It consists of 3 pieces of CRPF and 2 pieces of CISF.
News English Title: CRPF 10 battalions posted in state Corona virus covid 19 outbreak lockdown News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News