19 October 2021 8:38 AM
अँप डाउनलोड

गुजराती जनतेची भाजप वर प्रचंड नाराजी : शिवसेना

मुंबई : गुजरात विधानसभा सुरवातीच्या निकालावरून भाजप वर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी निकालाचे कल पाहता भाजप वर निशाणा साधला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एकूण १८२ जागांपैकी भाजपला ९९ आणि काँग्रेसला ८० जागा मिळाल्या आहेत. १५० जागांचे उद्धिष्ट असलेल्या भाजपला साधी शंभरी ही गाठता आली नाही. काँग्रेस ने गुजरात मध्येच भाजप आणि मोदी यांना कडवी झुंज दिली जो देशभर चर्चेचा विषय बनला.

त्याच संधीचा फायदा घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधला. गुजरात विकासाचं मॉडेल हा केवळ देखावाच होता हे सुध्दा या निकालावरून सिध्द झाल्याचं संजय राऊत म्हणाले.

देशातील महत्वाचे प्रश्न म्हणजे काश्मीर मुद्दा, नोटबंदी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या सारखे विषय सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं ही संजय राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे शिवसेनेचे मुखपत्रं सामना मधूनही संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस ची स्थुती केली आहे.

तर शिवसेनेला प्रतिउत्तर म्हणून भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी हि ट्विट करत संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x