18 September 2021 10:21 PM
अँप डाउनलोड

विद्यार्थ्यांचे प्रवेश जात प्रमाणपत्राअभावी रद्द केले जाणार नाहीत

नागपूर : महाराष्ट्रातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रवेश जात प्रमाणपत्राअभावी रद्द केले जाणार नाहीत असं समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात स्पष्ट केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी संबंधित प्रश्न उपस्थित केला असता त्यावर समाजकल्याण राज्यमंत्र्यांनी सभागृहाला उत्तर दिले.

संपूर्ण यादी हि उच्च न्यायालय आणि सर्वोच न्यायालय यांच्या आदेशानेच प्रसिध्दी करण्यात आली आहे आणि त्यात कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय झाला नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सभागृहाला दिलेल्या या स्पष्टीकरणाने विद्यार्थ्यांना मात्र मोठा दिलासा दिला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x