27 July 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, मोदींच भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना आवाहन केलं की, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवू नका, हा मुद्दा एखाद्या विचारसरणीचा नसून, सभ्य समाजाला अशा प्रकारचे वर्तन शोभा देत नाही, असे मोदींनी म्हटले आहे.

पुढे पंतप्रधान म्हणाले,’भारतीय समाजाला बळकट करणाऱ्या तसेच सकारात्मक बातम्यांच्या प्रचारासाठी वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली २ कुटुंबांतील संघर्ष सुद्धा “नॅशनल न्यूज’ होते. हल्ली लोक काही तरी चुकीचे पाहतात, ऐकतात आणि पुढे तेच फॉरवर्ड केले जाते. यामुळे समाजाचे अत्यंत नुकसान होते आहे, हे कोणालाच समजत नाही. हा प्रश्‍न केवळ राजकीय पक्ष किंवा विचारधारेपुरता मर्यादित नसून तो देशातील सव्वाशे कोटी भारतीय जनतेचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा द्वेष पसरू नये आणि योग्य ती खबरदारी घ्यायला हवी’ असं पंतप्रधान म्हणाले.

परंतु क्षेत्रातील तज्ज्ञांना असे वाटते की सध्या समाज माध्यमांवरील खेळ आता भाजप विरुद्ध होऊ लागल्याने स्वतः पंतप्रधानांना त्यात उडी घेऊन आधी पक्षातील लोकांनाच समज देण्याची वेळ आल्याचे या संवादातून समोर येत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x