2 June 2023 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

गुजरात सरकार गुजराती नागरिकांना राज्यात घेत नाही - बाळासाहेब थोरात

Corona Crisis, Gujarat Migrants, Gujarat State, Balasaheb Thorat

मुंबई, ८ मे: नोंदणी होऊन आपापल्या गावी परतण्याची इच्छा असणाऱ्या लाखो मजुरांची स्थिती गेल्या दोन-चार दिवसांपासून आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी झाली आहे. अपुरी माहिती, अफवा यांच्यासह रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे राज्यभरातील सर्वच शहरांमधील मजुरांचे अडकलेले तांडे कुटुंबकबिल्यासह महामार्गावरून वणवण फिरत असल्याचे चित्र आहे.

मुंबईत स्थलांतरितांची संख्या किती, कितींची नोंदणी पूर्ण झाली, त्यापैकी किती आपापल्या गावी परतले याबाबत पोलीस दलाकडे माहिती नाही. मात्र ‘ग्रीड ९१’ संस्थेच्या अभ्यासकांनुसार महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबई महानगर प्रदेशात स्थलांतरित झालेल्या श्रमिकांची संख्या ३० लाखांवर आहे. यातील सर्वाधिक श्रमिकांचा राबता मुंबईत आहे. टाळेबंदीपूर्वी यातील आठ ते दहा टक्के स्थलांतरित आपापल्या गावी निघून गेले.

परराज्यातील मजूरांना स्पेशळ श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गतही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, गुजरात सरकार गुजराती नागरिकांना राज्यात घेत नसल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

परराज्यात अडकलेल्या मजूरांना गावी पोहोचविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी, संबंधित राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. ज्या राज्यात मजूरांना जायचं आहे. त्या राज्यातील सरकारने एनओसी देऊन या मजूर आणि स्थलांतरीत नागरिकांना आपलंस करणे आवश्यक आहे. मात्र, गुजरात सरकार, मुंबईसह महाराष्ट्राती विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना राज्यात घेत नाही, असा आरोपच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. थोरात यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधींना मेन्शन केले आहे.

 

News English Summary: The state government has started sending foreign workers to their state with the help of special labor trains. So, even within the district, migrants are returning home. However, Revenue Minister Balasaheb Thorat has accused the Gujarat government of not taking Gujarati citizens into the state.

News English Title: Story Gujarat government did not take Gujarati citizens into the state, Balasaheb thorat expressed concern News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x