13 May 2021 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न
x

सुप्रीम कोर्टाचा भाजपला झटका, बहुमत उद्याच सिद्ध करा

कर्नाटक : आज सकाळ पासूनच सर्वोच न्यायालयात कर्नाटकातील सत्तास्थापनेवरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. त्यात चर्चेअंती सर्वोच न्यायालयाने उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे थेट आदेश भाजपला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महत्वाचं म्हणजे भाजपने बहुमताची चाचणी सोमवारी घ्यावी अशी मागणी सर्वोच न्यायालयाकडे केली होती. परंतु सर्वोच न्यायालयाने भाजपची ही मागणी फेटाळून लावली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपला राज्यात सत्तास्थापनेसाठी पाचारण केले होते. त्याला जेडीएस आणि काँग्रेसने सर्वोच न्यायालयात आवाहन दिले होते.

संपूर्ण सुनावणी झाल्यावर भाजपला जास्त वेळेची मर्यादा न देता शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे थेट आदेश भाजपला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता भाजप समोरील समस्या वाढल्या असून त्यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासाहून सुद्धा कमी वेळ असून विरोधी पक्षांची मत फोडण्याचे मोठे आवाहन त्यांच्यापुढे आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1531)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x