23 September 2021 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

MP Bhavana Gawali | तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल

MP Bhavana Gawali

वाशीम, ०३ सप्टेंबर | शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. तीन तासापासून ईडीची टीम कार्यालयात चौकशी करत आहे. रिसोडनंतर दुसऱ्यांदा ईडीची टीम वाशिम जिल्ह्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल – ED reached in Washim linked to Shivsena MP Bhavana Gawali money laundering case :

चार दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांच्यावर 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. त्यानंतर ईडीने देगांव स्थित बालाजी पार्टीकल बोर्ड आणि रिसोड येथील दि रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीसह इतर दोन ठिकाणी चौकशी केली होती.

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांची चोरीची तक्रार 2020 मध्ये दिली. मात्र, सात कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला होता. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही सोमैया यांनी केला होता. 30 ऑगस्ट रोजी खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकारी पोहचले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED reached in Washim linked to Shivsena MP Bhavana Gawali money laundering case.

हॅशटॅग्स

#Shivsena(1143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x