11 August 2020 9:08 PM
अँप डाउनलोड

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार-मायावतींची भेट

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका जशा भाजपसाठी महत्वाच्या आहेत, तशाच त्या विरोधी पक्षांसाठी खूप महत्वाच्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्वच पक्ष अनेक राजकीय गणित मांडताना दिसत आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणाचा कल हा भाजप विरोधी होऊ लागला आहे आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि बसपाच्या सर्वेसेवा मायावतींमध्ये जवळपास दीड तास राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट हे या भेटीमागील प्रमुख कारण असल्याचं समजतं. तसेच विरोधी पक्षाचा संभाव्य पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर सुद्धा चर्चा झाली असण्याची बातमी आहे. सध्या भाजप विरोधी वातावरणाचा फायदा उचलून मोदींना तगडं आवाहन देण्याची व्यूहरचना विरोधकांकडून आखली जात आहे.

विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे नाव पुढे येत असले तरी शरद पवार यांचे देशातील सर्वच प्रमुख पक्षांशी चांगले राजकीय संबंध असल्याने आणि ते देशपातळीवरील अनुभवी व्यक्तिमत्व असल्याने ते सुद्धा विरोधकांचे प्रतिनिधी असू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x