7 May 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार? Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा
x

तामिळनाडू: चेन्नईसह ४ जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जूनपर्यंत लॉकडाउन

Chennai Lockdown

चेन्नई, १५ जून: भारतातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ११ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ३२५ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ५२० इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३ लाख ३२ हजार ४२४ पैकी १ लाख ५३ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ लाख ६९ हजार ७९८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. चार लॉकडाउन नंतरही देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट दररोज करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तामिळनाडूतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तिथे करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे राज्य सरकारने तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जून पर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई, चेनगालपट्टू, थिरुवल्लूर आणि कांचीपूरम हे ते चार जिल्हे आहेत. अत्यावश्यक सेवा, रुगणालय, चाचणी लॅब आणि वैद्यकीय सेवांना निर्बंधांमधून वगळण्यात येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

 

A complete lockdown has been decided in four districts of Tamil Nadu from June 19 to June 30. The four districts are Chennai, Chengalpattu, Thiruvallur and Kanchipuram. Essential services, hospitals, test labs and medical services will be exempted from the restrictions. This was reported by India Today.

News English Title: Complete Lockdown In Chennai Tamil Nadu Reimposes Restrictions In 4 Districts News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x