13 August 2020 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

मुंबई आणि उपनगरामध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

Mumbai Raining, BMC, Mumbai Municipal Corporation, Mumbai Manapa, Shivsena, Mumbai Mayor

मुंबई: शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफान पावसाने मुंबई शहराला रात्रभर अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

कालपासून मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका अनेक भागात बसला असून काही ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

काल संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला याचा फटका कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे. तसेच आज आणि उद्याही हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Mumbai(107)#Raining(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x