19 April 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

प्रभावशाली व्यक्तींमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान, पण मोदींना स्थान नाही

मुंबई : २०१७ साली ‘टाइम’च्या जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश होता. परंतु उन्नाव – कठुआ – सुरत बलात्कार प्रकरण, जीएसटी – नोटाबंदी यांसारख्या अनेक कारणांमुळे देशातील वातावरण खूपच तापलं आहे आणि याचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर होत असल्याचं म्हटलं जात आहे.

‘टाइम’ मासिकाने २०१८ मधील जगात सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. परंतु देशात आणि जगात बोलबाला असण्याच्या मोदींच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण ‘टाइम’ ने घोषित केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेशच नाही. ‘टाइम’ मासिकाने २०१८ मधील जगात सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीतून मोदींना वगळण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदी यांचा जागतिक प्रभाव उन्नाव, कठुआ, सुरत बलात्कार प्रकरण, जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या अनेक कारणांमुळे कमी झाल्याचे बोलले जात आहे. २०१७ मधील जागतिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नरेंद्र मोदींबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांचा समावेश होता. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की, मोदी वगळता त्या सर्व जागतिक नेत्यांची नाव २०१८ मधील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत यंदा सुद्धा आहेत.

‘टाइम’ ने घोषित केलेल्या २०१८ मधील जागतिक प्रभवाशाली व्यक्तींच्या यादीत ब्रिटनचं प्रिन्स हॅरी, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याही नावाचा समावेश आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x