29 March 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

राज्यात अर्थ 'काट-कसर' असताना मेटेंसाठी २० लाखांची 'कार-कसर'

मुंबई : महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट असताना विनायक मेटे यांच्यासाठी शासकीय खर्चातून २० लाखांची कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक निर्णय जारी केला आहे.

विनायक मेटे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या विशेष सोयीसाठी आलिशान कार दिली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या खर्चाने ही कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा निर्णय जारी केला आहे. राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याने अर्थ खात्याकडून काटकसर करण्यात येत असला तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र विनायक मेटे यांना कार खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास दबाव आणल्याची राजकीय चर्चा सुरु आहे.

आधीच सर्व घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत आणि त्यात विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिल्लीत परिषद घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच अडचणीत आणखी वाढ व्हायला नको म्हणून विनायक मेटे यांची कार कि सवारी सोपी झाली.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x