13 May 2021 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न
x

योगी ते फडणवीस, कमळावर देखील घराणेशाहीच्याच पाकळ्या

BJP, Amit Shah, Narendra Modi

नवी दिल्ली : सध्या लोकसभेच्या अनुषंगाने सत्ताधारी भारतीय जनता पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत असून भाजप त्यातला नाही असं भासवत आहे. परंतु, भाजपची सध्याची कुंडली तपासल्यास ते इतर पक्षांच्या तुलनेत काही कमी नाहीत असंच चित्र आहे. त्यामुळे घराणेशाही या विषयावर भाजपने न बोललेलं बरं, असा सूर विरोधकांनी लावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अगदी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील त्याच घराणेशाहीचा भाग आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. घराणेशाहीची कीड सर्वच पक्षांमध्ये पसरली असली तरी भारतीय जनता पक्ष त्याला अपवाद नाही. त्यात मोठ्या प्रमाणावर केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेतेमंडळींच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.

त्यामुळे विरोधकांवर भाजप घराणेशाहीचा कितीही आरोप करत असला तरी भाजपात देखील तेच होत आहे अशी आकडेवारी सांगते. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांची मोठी कौटुंबिक यादीच घराणेशाही सिद्ध करत असली तरी राजकीय धुरळा उडण्याच्या भीतीने अजून तरी जय शहा आणि शौर्य डोवल यांची नावं जाहीर करण्यात अडचणी येत असाव्यात, अस विरोधकांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1531)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x