ASSOCHAM'च्या कार्यक्रमात अर्थव्यवस्थेबद्दल मोदी धादांत खोटं बोलले; पहा २०१४ आधीचे वृत्त
नवी दिल्ली : भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा दृष्टीनं भारताची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पछाडत पुढे जाण्याचा मान मिळवला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फ्रान्स कब्जा मिळवला आहे. जिथे भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून घसरून सातव्या क्रमांकावर गेली असून, अमेरिका या यादीत नंबर वनवर कायम आहे.
२०१७ साली भारतीय अर्थव्यस्थेचा आवाका २.६५ ट्रिलियन डॉलर इतका होती. त्यावेळी भारताची अर्थव्यस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यस्था होती. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार २०१७ साली युनायटेड किंग्डम २.६४ ट्रिलियन डॉलरसहीत सहाव्या आणि फ्रान्स २.५९ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसहीत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये सातव्या स्थानी होता.
२०१८ साली युनायटेड किंग्डमच्या अर्थव्यस्थेचा विस्तार होऊन ती २.८२ ट्रिलियन डॉलर तर फ्रान्सची अर्थव्यवस्था २.७८ ट्रिलियन डॉलर इतकी झाली. तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याने एका वर्षात त्यामध्ये केवळ ०.८ ट्रिलियन डॉलरने वाढ होऊन ती २.७३ ट्रिलियन डॉलर इतकी झाल्याचे जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालामध्ये नमूद केलं आहे.
या अहवालानुसार २०१८ च्या डॉलरच्या दरानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ३.०१ टक्क्यांनी वाढ झाली. २०१७ साली हीच वाढ १५.५२ टक्के इतकी होती. भारताच्या तुलनेत २०१८ मध्ये युनायटेड किंग्डमची अर्थव्यस्था ६.८१ टक्क्यांनी तर फ्रान्सची अर्थव्यवस्था ७.३३ टक्क्यांनी वाढली. २०१७ पेक्षा २०१८ मध्ये युनायटेड किंग्डमची अर्थव्यवस्था वाढीचा वेग ०.७५ टक्के अधिक होता तर फ्रान्सची अर्थव्यवस्था याच काळात ४.८५ टक्के अधिक वाढली.
अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्था 2017च्या तुलनेत 2018मध्ये घसरल्यानं भारताचा क्रमांकही मागे पडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 2017मध्ये जवळपास 18 हजार खरब एवढी उडी घेतली होती. तर त्यावेळी ब्रिटन सहाव्या क्रमांकावर, तर फ्रान्स 7व्या क्रमांकावर होते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत असल्यानं भारताची घसरण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
दरम्यान देशभर आणि समाज माध्यमांवर लोकसभेपूर्वी एकच चर्चा रंगली होती आणि ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मोदींच्या नैत्रुत्वात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. दुसरी महत्वाची गंभीर गोष्ट म्हणजे जवाबदार प्रसार माध्यमं देखील कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाचकाकडे तेच खाद्य पोहोचवून २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने “मोदी मृगजळ” निर्माण करत होते का अशी शंका निर्माण झाली आहे. वास्तविक सामान्य वाचकाला अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे बदल याबद्दल सखोल असं काही कळत नसतं आणि ते मोजण्याची नेमकी परिमाणं काय असतात याची देखील त्यांना जास्त माहिती नसते. नेमका त्याच विषयाचा धागा पकडून सध्या मोदींच्या नैतृत्त्वात भारतीय अर्थव्यवस्था इंग्लंड नंतर जापानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशा बातम्या जोरदारपणे पेरताना दिसत होत्या.
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वर जाते किंवा खाली येते त्याला त्या देशातील सरकारची आर्थिक धोरणं सर्वाधिक जवाबदार असतात. परंतु वाचकापर्यंत अशा बातम्या पोहोचवताना प्रसार माध्यमं खरंच वास्तव समजून घेऊन ते वाचकापर्यंत पोहोचवतात का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण वाचकाच्या अज्ञानाचा फायदा सद्याचे सत्ताधारी देखील घेत आहेत आणि जवाबदार प्रसार माध्यमं देखील सत्ताधाऱ्यांना साथ देत आहेत. अगदी २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आणि भाजपच्या नेत्यांनी, मोदींनीं आणि स्वतः तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारची पाठ थोपटून घेतली होती.
दरम्यान २०१४ नंतर पेड प्रसार माध्यमांचा सुळसुळाट वाढल्याने आणि काही ठराविक प्रसार माध्यमं सरकारचीच कामं करत असल्याने मोदी पंतप्रधान झाले आणि देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने मोठं मोठ्या देशांना मागे टाकत असल्याचा कांगावा सुरु केला होता आणि तो आजही सुरु असून २०२४च्या लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत असाच चिरंतर सुरु राहील अशी शक्यता आहे. कारण मोदी सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांचं वास्तव जनतेसमोर मांडण्याचं धाडस आज प्रसार माध्यमं करताना दिसत नाही.
सध्या सर्वच प्रसार माध्यमांवर प्रसारित झालेली बातमी म्हणजे, चालू वर्षात भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. कारण भारत ६व्या स्थानावर असून ब्रिटन जगातील ५वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता. त्यानुसार भारत ब्रिटनला मागे टाकणार असून ५व्या स्थानावर झेप घेईल. तसेच २०२५ सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रात जापानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे अनुमान ‘आयएचएस मार्किट’ने आपल्या अहवालात नमूद केले होते.
मात्र प्रसार माध्यमं वाचकांपासून अत्यंत महत्वाची गोष्ट लपवत असून थेट मोदी सरकारची मदत करत असून, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर पांघरून घालून अर्थव्यवस्था अजून धोक्यात घालत होते. होय! कारण भारतीय अर्थव्यवस्था २०१४ पूर्वीच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती व स्वतः जागतिक बँकेने तो अहवाल दिला होता. संबंधित विषयाला अनुसरून त्यावेळी अधिकृत बातम्या सर्वच प्रतिष्ठित प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. अर्थात त्याचा सबळ पुरावा देखील आम्ही देत आहोत. इतकंच नव्हे तर १९९६ ते १९९८ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर होती. २०१४ पूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था ३ऱ्या क्रमांकावर होती यासंबंधित बातम्यांचा तत्कालीन पुरावा आपण येथे क्लिक करून वाचू शकता (‘द हिंदूं’ची तत्कालीन बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा). तर १९९६ ते १९९८ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकून ४थ्या क्रमांकावर होती याची तत्कालीन बातमी येथे वाचा (‘इंडिया टुडे’ची तत्कालीन बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा). या संबंधित एक-दोन नव्हे तर अनेक बातम्या झळकल्या होत्या आणि त्याचे पुरावे आजही आहेत.
आता विषय हाच आहे की जर भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच तिसऱ्या क्रमांकावर होती, तर मोदी सरकारच्या सत्ताकाळात ती सध्या ६व्य क्रमांकावर का आहे असे प्रश्न मोदींना विचारण्याचे धाडस आजच्या प्रसार माध्यमांमध्ये अजिबात नाही. जर काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था जगात ३ऱ्या क्रमांकावर होती, मग मोदींनी अशी नेमकी कोणती धोरणं राबवली कि आज भारतीय अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. अर्थात चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे असंच त्याचं उत्तर असेल. नोटबंदीमुळे देशाचा फायदा झाला आणि आमची आर्थिक धोरणं योग्य आहेत हे दाखविण्यासाठी थेट प्रसार माध्यमांना हाताशी धरून २०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदारपणे सुरु आहे आणि देशातील सर्वच अर्थतज्ज्ञांना मोदी सरकार वेड्यात काढत असून तोच प्रकार त्यांनी आज ASSOCHAM कार्यक्रमात केला आणि ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेबद्दलचा विषय काही अचानक समोर आलेला नाही. कारण मागील ५ वर्षांत देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली आहे, त्यामुळेच ते लक्ष गाठता येणं शक्य आहे. ५-६ वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून जात होती, परंतु आमच्या सरकारने त्यात अनेक बदल करून ती स्थिर केली. मात्र काही दिवसांपासून विरोधी पक्ष केंद्र सरकारला वाईट अर्थव्यवस्थेसाठी जवाबदार धरत आहेत, असं देखील मोदी म्हणाले.
PM Modi: 5-6 years back our economy was heading towards disaster, our Govt has not only stabilized it, but also made efforts to bring discipline to it. We have paid attention to fulfilling the decades old demands of the industry. https://t.co/TztGxFKucu pic.twitter.com/bs8ktFXXeJ
— ANI (@ANI) December 20, 2019
Web Title: PM Narendra Modi shared misinformation in ASSOCHAM speech about Indian Economy.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA