20 May 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

MRP Agro Share Price | एमआरपी ऍग्रो शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पूर्वी फायदा घ्या

MRP Agro Share Price

MRP Agro Share Price | एमआरपी ऍग्रो लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. एमआरपी ऍग्रो लिमिटेड कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली होती.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआरपी ऍग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.34 टक्क्यांच्या वाढीसह 142 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी एमआरपी ऍग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 149.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमआरपी ऍग्रो लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा तर केली आहे, मात्र त्यासाठीची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पुढील काही दिवसांत एमआरपी अॅग्रो लिमिटेड कंपनी रेकॉर्ड डेट जाहीर करेल. 28 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत MRP Agro Limited कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.

एमआरपी ऍग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 182.89 रुपये होती. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 184.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 308.21 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MRP Agro Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

MRP Agro Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x