अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं | मात्र त्यालाही एक सीमा असते | कॅनडाचे पंतप्रधान
ओटावा, १ नोव्हेंबर: फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही. 72 तासांत दुसऱ्यांदा एकदा हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या ल्योन सिटीमध्ये चर्चच्या गेटवर चर्चच्या फादरवर गोळी झाडून अज्ञात हल्लेखोर फरार झाला आहे. चर्चच्या धर्मोपदेशकाला मारल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 72 तासांतला हा दुसरा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीक पारंपरिक चर्चमधील फादरवर खूप जवळून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
या हल्ल्यात चर्चचे मुख्य धर्मोपदेशन गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. फरार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी लांब काळा कोट घातला होता. या कोटात त्यानं बंदूक लपवून ठेवली होती. ल्योन चर्चच्या जवळ जात त्यानं फादरवर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. फारदवर हल्ला झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल केलं आहे. हल्लेखोरांचा यामागे काय उद्देश आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी इस्लामिक कट्टरता आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान ट्रूडो यांनी शुक्रवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव केला. मात्र याच बरोबर, याला एक सीमा असते असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, कुठल्याही समाजाच्या भावना जाणूनबुजून दुखावणे चुकीचे असल्याचेही कॅनाडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे.
फ्रान्समधील व्यंग्यचित्र मॅगझीन शार्ली हेब्दोमध्ये छापल्या गेलेल्या पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्रावरून (cartoons) ट्रुडो यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ट्रुडो म्हणाले, आम्ही नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव करू. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही एक सीमा आहे. आपण इतरांचा सन्मान करायला हवा. तसेच ज्यांच्यासोबत आपण हा समाज आणि भूभाग शेअर करत आहोत त्यांना जाणूनबुजून दुखवू नये.
News English Summary: Canadian Prime Minister Justin Trudeau defended free speech on Friday, but added that it was “not without limits” and should not “arbitrarily and needlessly hurt” certain communities. “We will always defend freedom of expression,” Trudeau said in response to a question about the right to show a caricature of the Prophet Mohammed, as France’s Charlie Hebdo magazine did. “But freedom of expression is not without limits,” he added. “We owe it to ourselves to act with respect for others and to seek not to arbitrarily or unnecessarily injure those with whom we are sharing a society and a planet.”
News English Title: Free speech has limits Canadas PM Trudeau Prophet cartoons France News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा