22 September 2019 2:03 PM
अँप डाउनलोड

मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान

Aditya Thackeray, Aaditya Thackeray, Chandrakant Patil, Minister Chandrakant Patil, Shivsena, BJP Maharashtra

मुंबई : सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.

मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावरून भारतीय जनता पक्षातील नेते मंडळी खोचक विधानं करू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तसाच प्रकार भाजपचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे यात आदित्य आणि शिवसेना या दोघांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी तसे न करणेच योग्य ठरेल. असे प्रोजेक्शन केल्याने शिवसेनेतूनच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाराजीचे सूर उमटू शकतात’, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यात विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

तशी भावना आणि दबावदेखील आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. काँग्रेस-एनसीपीची आघाडी होणार हे नक्की आहे. अशावेळी युती झाली नाही तर सत्ता जाण्याचा धोका आहे. त्यामुळे युती ही केलीच पाहिजे आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही या धोक्याची जाणीव असणे आवश्यक आहे. युतीची गरज त्यांनाही आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष वेगवेगळे लढले. तेव्हा ते एकत्र आणि आम्ही वेगळे लढलो असतो तर कदाचित सत्ता आली नसती.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या