14 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

नेतेगिरी मिरवू नका पक्षाला काय दिले ते सांगा: जे. पी. नड्डा यांनी खडसावले

BJP Maharashtra, Maharashtra Assembly Election 2019, J P Nadda

मुंबई : मी २५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करतो, २० वर्षे पक्षाचे काम करतो असे स्वत:ला मिरवण्यापेक्षा एवढ्या वर्षात तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि निकाल देणारं काम करा अशा कानपिचक्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत येथे दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे,माजी पक्षाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान नड्डा चैत्यभूमी, सावरकर स्मारक, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक या ठिकाणी भेट देतील आणि त्यानंतर गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. गोरेगावमध्ये रविवारी होणाऱ्या मेळाव्याला नड्डा हजेरी लावणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी माहिती देखील पाटील यांनी दिली.

मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बैठकांचं आयोजन केलंय. यासाठीच भारतीय जनता पाकसाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मात्र या दौऱ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन केलं नसल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना नड्डा म्हणाले की आपल्याला पक्षामार्फत सत्ता कारणामध्ये कुठली पदे मिळतील याचा विचार करण्यापेक्षा पक्षात नेता म्हणून आपले स्थान कसे वाढेल याचा विचार करा. सत्तेचे पद आज आहे उद्या नाही. पण,नेतेपण आयुष्यभर टिकते. ते कसे टिकवायचे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही पक्षासाठी जे करताय त्याबाबत समाधानी आहात का याचे खरेखुरे प्रमाणपत्र स्वत:च स्वत:ला द्या, दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची वाट बघू नका, असेही ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x