20 April 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

सुशांत आत्महत्या प्रकरण | सीबीआयकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

Sushant Singh Rajput, Report examine, forensic department Dr Sudhir Gupta

मुंबई, २२ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता सीबीआय ची टीम करिनाच्या डीआरडीओ येथे दाखल झाली आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी याची चौकशी डीआरडीओ कलिना येथे सुरु आहे.

दरम्यान सुरजीत सिंह राठोर यांनी प्रसार माध्यमांकडे मोठा खुलासा केलाय. सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पोस्टमार्टम रुमपर्यंत गेली होती. ती तिथे ‘सॉरी बाबू’ म्हणत रात्रभर रडत होती. सुशांतच्या मृतदेहाजवळ ती ५ मिनिटं थांबली होती. रिया सुरजीत सिंह सोबत शवागरात सुशांतचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेली होती.

१५ जूनला मी कपूर हॉस्पीटलमध्ये होतो. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे सुशांतचे मित्र किंवा परिवारातील कोणी व्यक्ती नव्हत्या. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ, आई आणि एका व्यक्तीसोबत तिथे पोहोचले. कपूर हॉस्पीटलच्या मागच्या गेटजवळ ते थांबले. त्यानंतर रियाला घेऊन मी शवागरात गेलो. शवागरात गेल्यावर मी सुशांतच्या चेहऱ्यावरील चादर बाजुला केली आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी खूप भावूक झालो आणि रिया माझ्या शेजारी हात जोडून उभी होती असे सुरजीतने सांगितले.

सुशांतच्या गळ्यावरील फासाचे निशाण पाहता त्याने आत्महत्या केली असेल असे वाटत नसल्याचे तो म्हणाले. मी सुशांतच्या चेहऱ्यावरील चादर छातीपर्यंत खाली नेली. तेव्हा रियाने आपले दोन्ही हात ठेवून सॉरी बाबू असे म्हटले. ती सॉरी का बोलली ? याचा मी विचार करु लागलो.

दरम्यान, सुशांतचं पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर आणि एक्सपर्टच्या टीमची सीबीआयचे अधिकारी चौकशी करणार आहेत. सीबीआयला पोस्टमॉर्टम नीट झालं की नाही, रिपोर्टमध्ये काही गडबड आहे का? याबाबत शंका असल्याचं म्हटलं जात आहे.

सीबीआय मुंबई पोलिसांना देखील पोस्टमॉर्टमसंदर्भात काही प्रश्न विचारू शकते. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा तपास करण्यासाठी सीबीआयने नियुक्त केलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि AIIMS चे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी देखील रिपोर्टबाबत शंका उपस्थित केली आहे.

डॉ सुधीर गुप्ता यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वेळेचा कॉलम रिकामा का? असा सवाल केला आहे. टाईम स्टँप नसल्याचं म्हटलं आहे. आजतकशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘ही एक गंभीर बाब आहे. पोलिसांना याबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारणे आवश्यक होते की वेळेचा कॉलम रिकामा का आहे? मात्र पोलिसांनी असे केले नाही’ अशी प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली आहे. तसेच या पोस्टमॉर्टम अहवालाचा संपूर्ण तपास करण्यासाठी त्यांना 3 ते 4 दिवसांचा कालावधी जाणार आहे असं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: The Central Bureau of Investigation (CBI) has begun the investigation in Bollywood actor Sushant Singh Rajput’s mysterious death case. Today, the officials are expected to quiz the doctors at Cooper Hospital where late actor’s post mortem was conducted.

News English Title: Sushant Singh Rajput autopsy report examine forensic department Dr Sudhir Gupta News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x