9 May 2021 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
x

आयुषभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली | नियती कोणाला सोडत नाही

Former MP Nilesh Rane, Thackeray Government, Supreme court, Sushant Singh Rajput

मुंबई, १९ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

दरम्यान, या निकालानंतर माजी खासदार आणि भाजपचे निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे कुटुंबियांवर जळजळीत टीका केली आहे. यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “आयुषभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली, शिव्या घातल्या, हजारो कुटुंब उध्वस्त केली पण नियती कोणाला सोडत नाही.. ह्याच जन्मात ह्या कुटुंबाला हिशेब द्यावे लागणार. मनाला वाट्टेल तसे हे कारटे वागले पण आता लोकांकडून फटके खायची वेळ आली.”

 

News English Summary: Former MP and BJP’s Nilesh Rane has indirectly slammed Uddhav Thackeray’s family. Tweeting on this, he has said that for the rest of his life, one family waited for him, slandered him, cursed him, destroyed thousands of families, but destiny does not leave anyone behind.

News English Title: Former MP Nilesh Rane slams Thackeray Government after Supreme court decision on Sushant Singh Rajput News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x