29 April 2024 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे - संजय राऊत

Sushant Singh Rajput, Shiv Sena MP Sanjay Raut, Supreme Court verdict

मुंबई, १९ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय देत, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितलं आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलीस सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करत होतं. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा तपास सीबीआयकडे सोपवला जावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महाधिवक्ता बोलू शकतात अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, न्याय आणि संघर्ष करणारं राज्य आहे. राज्याने कधी कोणावर अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांची बदनामी आपल्याच राज्यातील नेते करत असतील तर ते राज्याचं खच्चीकरण आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांशी चर्चा केली आहे” असे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

 

News English Summary: Mumbai Police Commissioner and Advocate General of the state can comment on the court’s verdict, said MP Sanjay Raut. Regarding this, Sanjay Raut said that Maharashtra is a state of law, a state of justice and struggle. The state has never done injustice to anyone.

News English Title: Sushant Singh Rajput Death Shiv Sena MP Sanjay Raut Statement on the Supreme Court verdict News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x