15 December 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BREAKING: सुशांतचे गोड कौटूंबिक नातेसंबंध दाखवण्यासाठी माध्यमांकडून खोटे व्हिडिओ प्रसारित

Sushant Singh Rajput, dancing with choreographer Manpreet Toor, Media misreports, Niece Mallika Singh

मुंबई, १९ ऑगस्ट : सुशांतच्या मृत्यूची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे दिली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी रिया चक्रवर्तीने एप्रिलमध्ये सुशांतची बहिण प्रियंकाने तिला विचित्रप्रकारे स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुशांतच्या कुटूंबीयांशी त्याचे संबंध चांगले राहिले नव्हते असा दावा रिया चक्रवर्तीने केला होता.

त्यानंतर सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचं कुटुंबियांसोबत असलेलं नातं सिद्ध करण्यासाठी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले होते आणि तो अजिबात निराश नव्हता असं म्हटलं होतं. मात्र आता रियाचे दावे खोटे असल्याचं सिद्ध करण्यासाठी जवाबदार माध्यमांमधील प्रतिनिधीच या प्रकरणात व्यक्तिगतरीत्या उतरल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संभ्रम वाढविण्याचा हेतुपुरस्कर प्रयत्न हे प्रतिनिधी करत असल्याचं बोलू लागलं जाऊ लागलं आहे.

अगदी आजतक’च्या मुख्य संपादक अंजना ओम कश्यप यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यात दावा केला आहे की, सुशांत त्याच्या भाचीसोबत नाचत आहे. त्यात अंजना कश्यपने म्हटलं आहे की, “सुशांतसिंग राजपूत यांचा हा व्हिडिओ पहा. मामा आपल्या भाचीशी कशी मजा घेत आहेत. कौटुंबिक प्रेम! तो आपल्या मोठ्या बहिणी राणीच्या मुलीच्या मल्लिका सिंगसह नाचत आहे.

धक्कादायक म्हणजे इंडिया टुडे ग्रुपच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर स्वतःचा फॅक्ट-चेकिंग डेस्क आहे. तसेच ते फेसबुक फॅक्ट-चेकिंग पार्टनर असून आंतरराष्ट्रीय फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (आयएफसीएन) सोबत त्यांचा करार आहे. मात्र त्यानंतर देखील जाणीवपूर्वक फेक व्हिडिओ पसरवून या मोठ्या माध्यमांतील प्रतिनिधींचा मूळ हेतू शंका घेण्यासारखाच आहे असं महाराष्ट्रनामा न्युजच्या टीमने फॅक्ट चेक केल्यावर समोर आलं आहे.

मात्र त्यानंतर हाच व्हिडिओ ABP News, Hindustan, Patrika, The Times of India, Times Now, India TV, News Nation and ABP News अशा प्रमुख वृत्त वाहिन्यांनी देखील प्रसिद्ध केला आणि देशभर ते सत्य समजलं गेलं. सुशांत त्याच्या कुटूंबीयांसोबत किती खुश होता हे दाखवण्यासाठी मोठी फौज मैदानात उतरल्याचा आरोप याआधीच सुरु असताना फॅक्ट चेकमध्ये बरंच काही सिद्ध होतं आहे.

वास्तविक सुशांतसोबत नृत्य करणारी महिला सुशांतची भाची नसून पंजाबी नृत्य दिग्दर्शक मनप्रीत तोर आहे. सदर नृर्त्याचा व्हिडिओ 18 ऑगस्ट रोजी सार्वजनिक झाला असला तरी २०१७ मध्ये मनप्रीत तोर’ने सुशांतसोबत “राबता” सिनेमासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आणि त्याच रेकॉरिंड ४ जुन २०१७ रोजी झालं होतं. त्याचे फोटो देखील तिने पब्लिश केले होते.

त्यानंतर ७ जून २०१७ रोजी तिने हाच व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यांचे कपडे देखील तेच आहेत. ठराविक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पसरवत असलेला व्हिडिओ त्याच वेळच्या मौजमजेचा आहे. त्याचाच संदर्भ थेट सुशांतच्या भाचीशी जोडून संभ्रम वाढविण्याचे उद्योग सुरु आहेत असंच म्हणावं लागेल. रियाच्या आरोपानंतर सुशांतचे त्याच्या कुटुंबियांसोबत कसे संबंध होते हे याचा प्रयत्न त्याचे कुटूंब कमी आणि ठराविक माध्यमांचे प्रतिनिधी अधिक करत असल्याचं फॅक्ट चेकमध्ये पुराव्यानिशी समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

Don’t forget to check out Raabta releasing June 9th! @sushantsinghrajput #thatonetimeiwenttoindia

A post shared by Manpreet Toor (@toor.manpreet) on

 

News English Summary: Aaj Tak’s editor-in-chief Anjana Om Kashyap tweeted a video claiming it shows Singh dancing with his niece. “See this video of Sushant Singh Rajput. How the uncle is having fun with his niece. Family love! He is dancing with his eldest sister Rani’s daughter’s Mallika Singh.

News English Title: Sushant Singh Rajput dancing with his choreographer Manpreet Toor Media misreports he is dancing with his niece Mallika Singh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x