27 June 2022 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

सुशांत प्रकरणाचा तपास CBI'कडे | यापूर्वीच्या तपासांची पवारांकडून केंद्राला आठवण

Sharad Pawar, Sushant Singh Rajput, CBI Case, Dr Narendra Dabholkar Murder

मुंबई, २० ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय या केंद्रीय संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला खात्री आहे की, अभिनेता सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्र सरकार सीबीआयला पूर्ण सहकार्य करेन. मात्र सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपाससारखा होऊ नये, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

“डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, अशी मला आशा आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून आपलं मत व्यक्त केलं. “सर्वोच्च न्यायालयानं सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल,” असंही ते म्हणाले.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडूनच व्हावा, ही महाविकासआघाडी सरकारची भूमिका होती. मात्र, बिहार सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाविकासआघाडीसाठी एकप्रकरचा धक्का होता. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तुर्तास नरमाईची भूमिका घेतली असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

News English Summary: The Maharashtra government will co-operate fully with the CBI in the investigation of actor Sushant Rajput’s case. However, the CBI is investigating the case. Pawar has also demanded that the investigation into the murder of Narendra Dabholkar should not be like that.

News English Title: NCP Leader Supremo Sharad Pawar Commented On Sushant Singh Rajput CBI Case Dr Narendra Dabholkar Murder Inquiry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(425)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x