28 June 2022 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत
x

पवारांवरील पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही...पक्षानेच कान टोचले

BJP leader Atul Bhatkhalkar, Gopichand Padalkar, Gopichand Padalkar

मुंबई, २४ जून : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

“शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांन कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय़ आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे भाजपाचे नेते अतुल भातखळकर गोपीचंद पडळकरांच्या विधानावर म्हणाले की, भाजपा गोपीचंद पडकरांच्या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवारांशी वैचारिक मतभेद असले तरी या भाषेत टीका करणं चुकीचं आहे. तसेच पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असं अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवरील वादग्रस्त विधानावर गोपीचंद पडळकरांची शाळा घेतली आहे. गोपीनाथ पडकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाचं अधिकृत विधान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा शरद पवार असो, अशा पद्धतीने टीका करणं चुकीचं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

 

News English Summary: BJP leader Atul Bhatkhalkar on Gopichand Padalkar’s statement said that BJP completely disagrees with Gopichand Padalkar’s statement. Although there are ideological differences with Sharad Pawar, it is wrong to criticize in this language. Also, BJP has nothing to do with Padalkar’s statement, Atul Bhatkhalkar has clarified.

News English Title: BJP leader Atul Bhatkhalkar on Gopichand Padalkar’s statement said that BJP completely disagrees with Gopichand Padalkars statement News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x