19 August 2022 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार Box Office Report | 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाला 100 कोटींचा तोटा होऊ शकतो, रक्षाबंधन सिनेमाला सुद्धा प्रचंड नुकसान
x

कोरोनावरील कोरोनिल औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच मंजुरी - आयुष मंत्रालय

Patanjalis, Covid 19 Drug, Coronil, Ayush Minister Shripad Naik

नवी दिल्ली, २४ जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) काल झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.

हे औषध बाजारात आणण्यात आल्यानंतर पतंजलीनं त्यांची जाहिरात करण्यासही सुरूवात केली आहे. हे औषध घरपोच पोहोचवण्यासाठी अँप आणण्याची तयारी पतंजलीकडून सुरू असतानाच केंद्र सरकारकडून पतंजलीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, पतंजली आयुर्वेद लिमिटेडने करोना व्हायरसवर बनवलेल्या औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी देण्यात येईल असे आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी स्पष्ट केले. ‘आयुष’ मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं काल करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं. केंद्र सरकारनं करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश पतंजलीला दिले आहेत. पतंजलीने ‘करोनिल’ औषधासंबंधी जे दावे केलेत, त्याची पडताळणी पूर्ण होईपर्यंत दिशाभूल करणाऱ्या जाहीराती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

 

News English Summary: AYUSH Minister Shripad Naik on Wednesday said that the government would approve the Patanjali Ayurveda Limited’s corona virus drug after checking all the reports. The AYUSH ministry has asked Patanjali for details of the ingredients in the drug.

News English Title: Patanjalis Covid 19 Drug A Good Thing But There Are Rules Ayush Minister Shripad Naik News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamdevBaba(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x