28 March 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

कड्डक ट्विट! तुलसी जोशींच्या 'त्या' फाईल चोर व्हिडिओने महाराष्ट्र भाजप तोंडघशी

MNS, Tulsi Joshi, Raj Thackeray

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या तडाख्याने राज्यातील भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करत राज ठाकरे भाजपाला आणि मोदी-शहा या जोडीला व्हिडिओ पुराव्यानिशी कात्रीत पकडत आहेत. परंतु, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता महाराष्ट्र भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ या नावाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचे व्हिडिओ ट्विट करून त्यात राज ठाकरेंना मेन्शन करून टोला लगावत आहेत. वास्तविक ज्यांचा साडी चोरतानाचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे, त्या महिला कार्यकर्त्यांची त्याच दिवशी अधिकृतरित्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

दरम्यान, मनसे महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या साडी चोरी, संबंधित दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर संबंधित महिला पदाधिकाऱ्याची अधिकृतपणे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. स्वतः शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून तशी माहिती दिली होती. त्याच व्हिडिओला महाराष्ट्र भाजपने ट्विट करून थेट राज ठाकरे यांना मेंशन केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या मोदी-शहांवरील आरोपांच्या मूळ व्हिडिओवर पुराव्यानिशी उत्तर देण्याची धमक भाजपकडे नसल्याने ‘ए लाव रे तो व्हिडिओ’या टॅगलाईनने कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कृत्यांच्या व्हिडिओ ट्विट करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपाला मनसेचे पालघरमधील महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी एक व्हिडिओ ट्विट करून चांगलंच तोंडघशी पाडलं आहे. त्यात त्यांनी केंद्रातील राफेल फाईलमधील झालेल्या कागदपत्रांच्या चोरीचा अप्रत्यक्ष संदर्भ देत, तशा प्रकाराच्या फाईल चोरीच्या कृत्यात भाजपचे राज्यातील चौकीदार देखील सामील असल्याचा व्हिडिओ तुलसी जोशी यांनी ट्विट करत भाजपाला ‘मूळ विषयावर बोला’ असा थेट इशारा दिला आहे…अन्यथा पुढे अजून व्हिडिओ शेअर केले जातील असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

VIDEO: काय आहे तो नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x