15 August 2022 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठा दहशवादी हल्ला, 5 जण ठार

Terrorists attacked, Karachi Stock Exchange, Pakistan

कराची, २९ जून : पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस उप-निरीक्षक आणि चार सुरक्षारक्षक ठार झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जिओ न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

दहशतवाद्यांनी कराची शेअर बाजारात शिरताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रेनेड हल्ला केला. याशिवाय अंदाधुंद गोळीबारदेखील करण्यात आला. चार दहशतवाद्यांपैकी तिघांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर एक दहशतवादी अद्याप आतमध्ये लपला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच संपूर्ण परिसर सील केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कराची स्टॉक एक्सचेंज सकाळी 10.30 वाजता उघडतं. आजही रोजच्या वेळेत सुरू झालं. याचवेळी सर्वसामान्य लोकं आणि कर्मचारी दाखल होताच दहशतवादीही तिथे पोहोचले. क्षणात घटनास्थळी पळापळ सुरू झाली. तात्काळ याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

दहशतवाद्यांची पोलिसांचा गणवेश घातला होता. एका वाहनातून आलेल्या या दहशतवाद्यांनी पार्किंगमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारावर हल्ला केला. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

 

News English Summary: All the terrorists who attacked the Karachi Stock Exchange in Pakistan have been killed, police said. The stock exchange was attacked by four terrorists.

News English Title: All the terrorists who attacked the Karachi Stock Exchange in Pakistan have been killed police said News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x