2 July 2020 11:55 AM
अँप डाउनलोड

अखेर २-३ शिल्लक असलेली लक्षणं सुद्धा कोरोनाशी जोडली गेली

Diarrhea, runny nose, nausea,  new symptoms, Corona Virus

नवी दिल्ली, 29 जून : देशात कोरोनाचा हाहाकार वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. भारतात 5.28 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या सगळ्यात, कोरोनाची काही नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल झाले की ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच आतापर्यंत सगळ्यांना माहिती होतं. परंतु अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. पावसाळ्यात भारतात ही लक्षण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

या अमेरिकेच्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाहणारं नाक, मळमळ आणि जुलाब होणं हीदेखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशी लक्षण तुम्हाला दिसली तर तात्काळ रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला या संस्थेकडून देण्यात आला आहे.

नाक वाहणे:
सीडीसीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचं नाव सातत्याने वाहत असेल आणि त्याला अस्वस्थ वाटत असेल, शिवाय ताप नसेल तरीही अशा व्यक्तीने कोरोनाची चाचणी करायला हवी. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी.

मळमळ होणे:
मळमळ होणं हे कोरोनाचं आणखी एक लक्षण असल्याचं अमेरिकेच्या सीडीसी या संस्थेने म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीसारखं वाटत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा व्यक्तीने तातडीने स्वत: विलग करायला हवं. मात्र मळमळ होण्याची इतर कारणंही असू शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करु नये. सातत्याने असं होत असल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी.

अतिसार:
कोरोना तिसरं नवं लक्षण म्हणजे अतिसार. डॉक्टरांनी याआधीही मान्य केलं होतं की कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसारासारखे मिळतेजुळते लक्षणे असतात. आता सीडीसीनेही मान्य केलं आहे की, जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे आढळले आहेत.

 

News English Summary: According to the US company, runny nose, nausea and diarrhea are also symptoms of corona. If you notice such symptoms, go to the hospital immediately and get tested for corona.

News English Title: Diarrhea runny nose nausea these three new symptoms added in Corona virus News latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(953)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x