14 December 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुरू आहे. या खेळात सध्या आठवा आठवडा सुरू आहे. आठवा आठवडा सुरू झाल्याबरोबर घरातील सर्व स्पर्धक  कॅप्टनसीसाठीसज्ज झाले होते. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कॅप्टनसीची धुरा पुन्हा एकदा अरबाज पटेलच्या हातात आली आहे. निक्कीमुळे अरबाजला पुन्हा एकदा कॅप्टन होण्याचा मान मिळवता आला आहे.

कॅप्टनसी टास्क :
दरम्यान, या आठवड्यात कॅप्टनसीसाठी वर्षा, सूरज, धनंजय आणि अरबाज असे चार उमेदवार मैदानात होते. यावेळी कोणाचं गोड पाणी कुणाची ताहन भगवणार हे कार्य पार पडलं. या कार्यात निक्की, अंकिता, पॅडी आणि सूरज यांना पळत जाऊन गजर वाजवायचा होता. यावेळी पाण्याचे डब्बे भरून ठेवण्यात आले होते.

अशा पद्धतीने अरबाज पुन्हा एकदा झाला कॅप्टन :
निक्की, अंकिता, पॅडी आणि सूरज यांना पाळत जाऊन बजर वाजवत आपल्या सर्धकला सेफ करून कॅप्टन करायचे होते. यावेळी निक्कीने दोन्ही वेळा पळत जाऊन अरबाजचे नाव कॅप्टनसीसाठी जिंकले आणि अशा पद्धतीने अरबाज पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात कॅप्टन झाला अही.

निक्कीने मिळवून दिली कॅप्टनसी :
अरबाजने या आधी देखील कॅप्टन होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर एका टास्कमध्ये त्याने निक्कीला आपली कॅप्टनसी गिफ्ट म्हणून दिली होती. त्यावर निक्कीने पुन्हा एकदा अरबाजसाठी टास्क खेळून त्याला कॅप्टनसी मिळवून दिली आहे. अरबाज या पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला आहे. बिग बॉसच्या घरातील पाचव्या पर्वाचा अरबाज हा पहिलाच सदस्य आहे ज्याने दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कॅप्टनसीवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली :
अरबाज कॅप्टन झाला असला तरी नेटकरी नाराज आहेत. अनेकांनी निक्की नसती तर अरबाज यावेळी घरातून बाहेर निघाला असता असं म्हटलं आहे. तसेच काहींनी निक्कीच कॅप्टन झाली आहे अशी कमेंट केली आहे. कारण अरबाज निक्की सांगेल तेच ऐकतो असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli and Arbaz 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x