12 December 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Lalit Modi and Sushmita Sen | सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्यावर रणवीर सिंगची ही कमेंट व्हायरल

Sushmita Sen and Lalit Modi

Lalit Modi and Sushmita Sen | काल रात्री ललित मोदी यांनी काही ट्विट करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. ललित मोदी यांनी खरं तर सुष्मिता सेनसोबतचे काही फोटो शेअर करत दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. ललित मोदी यांच्या या पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर इतक्या व्हायरल झाल्या की, प्रत्येक जण फक्त दोघांबद्दल चर्चा करत आहे. ललित मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर यावर रणवीर सिंगची प्रतिक्रियाही आली आहे. रणवीरने ललित मोदींच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

ललित मोदींच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स :
खरंतर ललित मोदींच्या या पोस्टवर रणवीरनं हार्ट इमोजी आणि न पाहिलेला इमोजी पोस्ट केला आहे. म्हणजेच या दोघांनाही रणवीरचे प्रेम मिळाले आहे. तसं पाहता ललितने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो आणि सुष्मिता एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. सुष्मितासोबतचे फोटो शेअर करताना ललितने लिहिले की, “लंडनमध्ये परत, मालदीव आणि सार्डिनियाचा एक विलक्षण वर्ल्ड टूर, माझे कुटुंब आणि माझी अर्धांगिनी सुष्मिता सेनसोबत. माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात.

ललित मोदी यांची घोषणा :
त्यानंतर त्यांनी ट्विट केले की, “सध्या आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. आमचं लग्न झालेलं नाही, पण जर आमच्यावर देव प्रसन्न झाला, तर ते लवकरच घडेल. मी फक्त आम्ही एकत्र आहोत असं सांगत आहे.

रोहमनसोबत ब्रेकअप :
यावर सुष्मिता सेनची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. यापूर्वी सुष्मिता रोहमन शॉलला डेट करत होती, परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की ती आणि रोहमन आता एकत्र नाहीत. 3 वर्षांपासून दोघांचे ब्रेकअप झाले होते.

sushmita-sen-and-rohman-shawl

प्रोफेशनल लाईफ :
आर्या आणि आर्या 2 सारखी उत्तम वेब सीरिज दिल्यानंतर सुष्मिता आता या मालिकेचा तिसरा सीझन घेऊन परत येत आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने आर्याचा तिसरा सीझनही येणार असल्याचं जाहीर केलं होतं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sushmita Sen and Lalit Modi news actor Ranveer Singh reaction check details 15 July 2022.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x