14 December 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • बिग बॉसच्या घरात आले डीजे क्रेटेक्स :
  • एलिमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा अंतिम आठवडा संपण्यासाठी केवळ 4 दिवस बाकी आहेत. एकीकडे प्रेक्षकांमध्ये विजेता कोण होणार या चर्चांना उधाण आलेलं आहे. तर, दुसरीकडे घरातीलच सदस्यांमध्ये कोण पुढे जाणार यामध्ये चढा ओढ सुरू आहे. त्याचबरोबर या मिडविकमध्ये प्रत्येकात्सव ग्रँड सेलिब्रेशन देखील सुरू आहे. ग्रँड सेलिब्रेशनचा प्रोग्राम कायम बिबींच्या घरातच पार पडतो परंतु या वेळेस प्रत्येकाची आत्तापर्यंतची जर्नी दाखवण्यासाठी त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये बाहेर बोलावून सर्व काही सेलिब्रेट केलं जात आहे. प्रत्येक सदस्याची रेड कार्पेट वरून एंट्री देखील होत आहे.

अशातच बिग बॉसच्या आजच्या भागाचा एक प्रोमो सोशल मीडिया चांगलाच वायरल होताना दिसतोय. यामध्ये सदस्यांना मनसोक्त नाचण्यासाठी स्वतःचा आनंद लुटण्यासाठी चक्क घरामध्येच डीजे बोलावण्यात आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला बिग बॉस अनाउन्स करतात की,” बिग बॉसच्या घरात आले आहेत डीजे क्रेटेक्स”.

बिग बॉसच्या घरात आले डीजे क्रेटेक्स :
‘डीजे क्रेटेक्स’ म्हणजेच कृणाल घोरपडे. कृणाल घोरपडे हा एक डीजे ऑर्गनायझर असून. डीजे क्रेटेक्स या नावाने त्याची बाहेर ओळख आहे. त्याची इंस्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोविंग पाहायला मिळते. कृणाल घोरपडे हा मराठमोळा मुलगा असून तो त्याच्या डीजेचे अनेक कार्यक्रम गाजवतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बऱ्याच मराठमोळ्या कार्यक्रमांमध्ये कृणाल घोरपडेचा डीजे आवर्जून ठेवला जातो. त्याच्या डीजे सुरू झाल्याबरोबर कोणताच व्यक्ती एका जागेवर शांत बसू शकत नाही. त्यामुळे बीबीनी चक्क घरातील सदस्यांना मनसोक्त थीरकाता यावं यासाठी कृणाल घोरपडे याचा डीजे क्रेटेक्स घरामध्ये बोलावला आहे.

एलिमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर :
कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉसच्या घरातील आजच्या भागाचा हा प्रोमो वायरल करून कॅप्शनमध्ये असेल की,”घरात डीजे kratex च्या तालावर सगळे थीरकणार, मिडविक एलिमिनेशनची तलवार डोक्यावर लटकन”. त्याचबरोबर बिग बॉस देखील अशी घोषणा करतात की,”आज होणार आहे या सीजनचं मिडविक एलिमिनेशन”. बिग बॉसच्या घोषणेनंतर सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. त्यामुळे घराचा निरोप घेणारा पुढील सदस्य कोण असणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. सर्वचजण 6 ऑक्टोबरची वाट पाहत आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi DJ Kratex 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x