12 December 2024 4:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा - सचिन सावंत

Sachin Sawant, Sandeep Singh, Sushant Singh Rajput

मुंबई, २८ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलिसांकडून सुरू होता. मात्र सुशांतच्या कुटुंबासह विरोधकांनी सीबीआय तपासाची मागणी केली. महाविकास आघाडी सरकार सुशांतच्या गुन्हेगारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप भाजपानं केला होता. यानंतर आता काँग्रेसनं भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात संदीप सिंहचं नाव पुढे आलं आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.

संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. सुशांतसिंह प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह वादात आहे. संदीप सिंह हा ‘पंतप्रधान मोदी’ यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळं ‘सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजपचाही तपास करावा, ड्रग्जप्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करा’, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, सचिन सावंत यांच्या आरोपांना केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा बायोपिक संदीप सिंह बनवणार असल्याचा दिला दाखला उपाध्ये यांनी दिला आहे. सावंत यांच्या ट्वीटला री-ट्वीट करत उपाध्ये यांनी ‘थोडा होमवर्क नीट करत जा. आता हे पहा आणि आता याच्याशी पण संबंध जोडणार का सचिन सावंतजी?’ असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Sandeep Singh is the producer of a film on ‘Prime Minister Modi’. Sandeep Singh is seen on stage with former Chief Minister Devendra Fadnavis during the release of the film poster. Therefore, while interrogating Sandeep Singh in the Sushant case, the BJP should also be investigated.

News English Title: Sachin Sawant requests to investigate BJP drug angle with Mr Sandeep Singh in Sushant Singh case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x