मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार ही ब्रेकिंग न्यूज झाली- अजित पवार
पिंपरी, २८ ऑगस्ट : “आज देवेंद्र फडणवीस आणि मी या कार्यक्रमाला एकत्र आलो आहोत. आम्ही नुसतं कार्यक्रमाला एकत्र येणार असं समजल्यावर कालपासूनच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. कदाचित चंद्रकांत पाटीलही या ठिकाणी येणार आहेत याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती म्हणून त्यांचं नाव आलं नाही. नाहीतर त्यांचंही नाव सोबत आलं असतं,” असं पवार म्हणाले. “राजकीय भूमिका, राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात. निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचा असा भेदभाव, आरोपप्रत्यारोप न करता संकटाच्या काळात एकत्र काम करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसंच वागलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक मिळून एकत्र या संकटाचा सामना केला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले. उपमुख्यमंत्री पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, कोरोना हे मोठे संकट आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यापेक्षा चूक लक्षात आणून देऊन काम केले पाहिजे. काळानुरूप काही पावले आपल्याला उचलावी लागली. कोरोनाची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना खबरदारी बाळगली पाहिजे. कोरोनाचे संकट गणरायाने दूर करावे, असे साकडे घालतो.
News English Summary: Today Devendra Fadnavis and I have come together for this event. The breaking news started yesterday when we realized that we would just come together for the event. Maybe he had no idea that Chandrakant Patil would also come to this place so his name did not come up said Ajit Pawar.
News English Title: Deputy CM Ajit Pawar Pune Pimpri Chinchwad Covid Care Center Inauguration Former CM BJP Devendra Fadnavis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा