27 November 2022 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 16 Wild Card Entry

Bigg Boss 16 | प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून ‘बिग बॉस 16’ सीझनला सुरुवात झाली आहे. यावेळीच्या सीझनमध्ये काही ट्वीस्ट असणार आहेत तर बिग बॉस देखील स्पर्धाकांसोबत खेळणार आहेत. तसेच यावेळी सीझनसाठी नवीन नियम बनवण्यात आले आहेत. दरम्यान, वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगत आहे, आणि केवळ एक स्पर्धकच नाही तर एकामागून एक अनेक स्पर्धक या शोचा भाग होण्यासाठी तयार आहेत. बिग बॉसमध्ये कोणत्या स्पर्धकाची एन्ट्री होणार याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत, चला जाणून घेऊया…

लवकरच दिसणार नवा चेहरा
रिलीज झालेल्या नवीन प्रोमोनुसार, टांझानियाची राहणारी किली पॉल लवकरच शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे आणि नुकताच किली पॉलचा भारतात पोहोचण्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगत आहे. काइली पॉलशिवाय या शोमध्ये आणखी अनेक स्पर्धकांची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.

राजीव अडातिया लवकरच दिसून येणार
बिग बॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये दिसलेला राजीव अडातिया पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार आहे तर गेल्या सीझनमध्ये राजीव अदातिया लवकरच शोमधून बाहेर पडला पण त्याला पुन्हा एकदा रिंग मास्टर म्हणून एंट्री मिळाली आहे. तर आता राजीवही नव्या सीझनमध्ये प्रवेश करू शकतो, असे बोलले जात आहे. सूर्या मिश्रा-सोशल मीडिया प्रभावक सूर्या मिश्रा देखील बिग बॉसच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश करू शकतो. तर करण कुंद्रा, जो बिग बॉस 15 चा दुसरा उपविजेता होता, तो देखील बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये पुन्हा दिसू शकतो आणि जुन्या सीझनमध्ये एक मनोरंजक प्रेम कपल असलेले तेजस्वी आणि करण शोमध्ये एका खास टास्कचा भाग बनण्यासाठी पुन्हा शोमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा रंगत आहे.

काइली पॉलने अब्दु सोबत डान्स केला
बिग बॉसच्या रिलीज झालेल्या नवीन प्रोमोमध्ये या शोमध्ये किली पॉलची जबरदस्त एन्ट्री दिसून आली आहे तर किली पॉल शोमध्ये प्रवेश करताच त्याच्या सर्वोत्तम डान्स मूव्हसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. इतकंच नाही तर किली पॉल अब्दूसोबत डान्स करतानाही दिसणार आहे, आणि किली पॉलला पाहून अब्दूला खुप आनंद होतो. आता किली पॉल या रिअॅलिटी शोमध्ये खेळण्यासाठी येणार आहे की तो या शोमध्ये पाहुणा म्हणून पोहोचला आहे, हे आगामी एपिसोडमध्येच कळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bigg Boss 16 Wild Card Entry Checks details 6 October 2022.

हॅशटॅग्स

Bigg Boss 16 Wild Card Entry(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x