6 December 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या
x

Bigg Boss Marathi | आता जानवीचं काही खरं नाही, विशाखा सुभेदार म्हणाल्या "ती बाहेर आल्यावर मी तिला भेटणारं" - Marathi News

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चांगलाच खुमासदार रंगला आहे. सध्या अनेकांच्या डोक्यावर एलिमिनेशनची सांगती तलवार असल्यास व पाहायला मिळतंय. कालच्या भागात दाखवल्याप्रमाणे वर्षा उसगावकर यांना ग्रँड फिनालेच्या आठवड्यात पोहोचून सुद्धा प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे घराची एक्झिट घ्यावी लागली.

त्याचबरोबर मागील आठवड्यात ग्रँड फिनालेच्या आठवड्यात पोहोचण्याआधीच पंढरीनाथ कांबळे याने घराचा निरोप घेतला. घराबाहेर पडल्याबरोबर पंढरीनाथ कांबळेचे अनेक इंटरव्यू घेण्यात आले. त्यांचे इंटरव्यू अजून देखील सुरूच आहेत. निक्की आणि जानवीमुळे पंढरीनाथ कांबळे यांना त्यांच्या कामावरून त्याचबरोबर उंचीवरून प्रचंड अपमान सहन करावा लागला आहे. हे समस्त महाराष्ट्राने पाहिलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यानचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये फक्त पंढरीनाथ कांबळेच नाही तर, त्याची जिवलग मैत्रीण हास्य जत्रा फिल्म विशाखा सुभेदार हिने देखील मुलाखतीत उपस्थिती दर्शवली आहे.

दरम्यान विशाखाने जानवीला चांगलं धारेवर धरलेलं पाहायला मिळतय. तिच्या नाराजीचा व्हिडिओ वायरल होत असून, अनेकांच्या मनात असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे की, जानवी किल्लेकर घराबाहेर आल्यानंतर विशाखा सुभेदार तिला सोडणार नाही. चला तर पाहूया नेमकं व्हिडिओमध्ये काय आहे.

असं म्हणाल्या विशाखा सुभेदार :

‘its maza’ या वृत्तवाहिनीने बिग बॉस आणि हास्य जत्रा फेम पंढरीनाथ कांबळे आणि त्यांची मैत्रीण विशाखा सुभेदार यांचा एक इंटरव्यू घेतला आहे. इंटरव्यू दरम्यान अनेक गप्पांना रंगत मिळाली. जास्तीत जास्त चर्चा पंढरीनाथच्या बिग बॉसच्या घरातील गोष्टींवरच होत होत्या. अशातच जानवीचा मुद्दा देखील आला. जानवीने पंढरीनाथ यांना त्यांच्या कामगिरीवरून टोमणे मारले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे रडण्याची ओव्हरऍक्टिंग करून हात जोडून सॉरी देखील म्हटली.

परंतु हे सर्व विशाखा सुभेदार यांना खोटं वाटल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या,”ती सॉरी म्हणली ना त्यावेळेस तर मला ते अजिबातच पटत नव्हतं कि ती अजिबातच दुःखी, कष्टी होऊन सॉरी म्हणत होती असं वाटत नव्हतं. ते सगळे खोटेच वाटत होते. नाटकी खोटं, बरी आहे पण, अभिनेत्री नसावी ही ते म्हणते काही छान नाही वाटलं. म्हणजे ती बाहेर आल्यावर मी तिला भेटणार आहे हा, मी तिला भेटणार आहे आणि तिच्याशी बोलणार आहे जाऊन. मी तिच्या नवऱ्याची ही मुलाखत ऐकली सगळं ऐकलं. त्याचेही मुद्दे असतील काही बरोबर. पण तिचा राग आहे ना जो त्या रागात तिनं काय बोलावं नॅशनल टीव्हीच्या याच्यात तिने खरंच विचार करायला पाहिजे आणि भान ठेवायलाच पाहिजे.

वय वर्ष तुझं काय आणि समोरच्याच काय याचा पण तू विचार केला पाहिजे”. पुढे विशाखा असं म्हणाली की,” पुढे तिची सॉरी म्हणाली ना दादा मला वाईट वाटतं मी अजून खरच खूप चुकीचं वागले हा सर्व तिचा खेळ होता आणि मला अजिबातच पटलेलं नव्हतं. मला माहित नाही तिला खरंच मनापासून सॉरी वाटलं की नाही, फील झालं की नाही ते पण मला तिला ते करवायचं आहे बाहेर आल्यावर”. अशा पद्धतीचे वक्तव्य विशाखा सुभेदार हिने केलं. बाजूला पॅडी दादा देखील बसले होते. त्या दोघांना जेवणासाठी त्याचबरोबर मुलाखतीसाठी आमंत्रित केलं होतं.

त्यांच्या या व्हायरल व्हिडिओला अनेक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर विशाखाताई अगदी बरोबर बोलल्या अशा पद्धतीच्या कमेंट्स देखील व्हिडिओला आल्या आहेत. आता बिग बॉसनंतर पंढरीनाथ पुन्हा हास्य जत्रेचा भाग होणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x