Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री कोणाची? सोशल मिडीयावर गाजतयं कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं नाव
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी सीजन 5 ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होताना पाहायला मिळते. बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांनी जल्लोषात तर, कोणी देवाला गाऱ्हाण घालून ट्रॉफी मीच जिंकणार असं आश्वासन बिग बॉस मंचावर प्रेक्षकांना दिलं आहे. सध्या बिग बॉसचा टीआरपी उच्चांक गाठताना दिसतोय.
दरम्यान मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याच्या शनिवार-रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर सर्वांना यायला फार आवडते. अशातच बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी कधी प्रेम, कधी लाड तर, कधी धुमशान राडे करून आतापर्यंतचे सर्व आठवडे गाजवले आहेत. अशातच इरीना बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडली आहे. त्यामुळे इरिनाच्या जागेवर कोणता नवीन कंटेस्टंट येणार अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.
बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन वैभव घुगे तर, येणार नाही ना? अशी चर्चा होताना दिसते. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, वाइल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये अभिजीत बिचुकले यायला हवेत. त्याचबरोबर राखी सावंत किंवा हास्य जत्रेमधील काही कलाकार वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन घरामध्ये प्रवेश करतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासूनच्या दोन टीममध्ये चांगलीच फूट पडलेली पाहायला मिळते. निक्की तांबोळी आणि जानवी कीलेकर या दोन घट्ट मैत्रिणी आता एकमेकांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटताना दिसतात. कोणी एकमेकांचा सहारा घेऊन गेम खेळत आहे तर काही जर इंडिव्हिजवली आपला गेम खेळताना दिसतायत. दरम्यान निक्की आणि अरबाज या दोघांची केमिस्ट्री पाहायला देखील प्रेक्षकांना आवडत आहे.
News Title : Bigg Boss Marathi Wild Card Entry check details 31 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
- Credit Card Interest Rate | बापरे! तुम्ही कोणतं क्रेडिट कार्ड वापरता? पेमेंट-डीले झाल्यास इतकं व्याज द्यावं लागणार