14 December 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Bigg Boss Marathi | आर्याने फोडलं निक्कीचं थोबाड! रडत म्हणाली 'बिग बॉस हिला बाहेर काढा'; बिग बॉस काय निर्णय घेणार?

Highlights:

  • Bigg Boss Marathi season 5
  • या गोष्टीमुळे निक्कीने मार खाल्ला
  • नक्की आणि आर्या काय म्हणाल्या?
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या पाचव्या सीजनमध्ये एक अशी गोष्ट घडली आहे जी या आधीच्या सीजनमध्ये कधी पाहायला नाही मिळाली. बिग बॉसच्या घरात धुमशान राडे, एकमेकांना उलट फिरून बोलणे, एकमेकांशी इज्जत आणि लायकी काढणे या सर्व गोष्टी होतच असतात. परंतु एखाद्याला शारीरिक इजा पोहोचता कामा नये ही सर्व सदस्यांची जबाबदारी असते.

मुळातच बीबींच्या घरात या कृत्याला थारा नाही. हिंसात्मक वातावरण तयार केल्याने त्या सदस्याला थेट बाहेरचा रस्ता बघावा लागतो. दरम्यान आर्याने एका टास्क दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये निकीच्या तडकन थोबाडीत लगावली आहे. त्यानंतर निक्की जोर जोरात रडायला लागली. नेमकं काय झालय पाहूया.

या गोष्टीमुळे निक्कीने मार खाल्ला
बिग बॉसच्या नव्या कॅप्टनसी पदासाठी सर्व सदस्यांकरिता एक नवा टास्क दिला गेला होता. या टास्कमध्ये एका बॉक्समध्ये हिरा ठेवलेला असून तो हिरा कोणीतरी एकाने मिळवायचा होता. वर्षा, अंकिता, निक्की, आर्या, जानवी या सर्वजणी जादुई हिरा मिळवण्यासाठी एकमेकांशी झटापट करत होत्या. याच झटापटीमध्ये आर्या आणि निक्कीची चांगलीच झुंबड पेटली. दरम्यान आर्याला राग अनावर होऊन तिने चक्क निक्कीच्या थोबाडीत मारली. त्यानंतर निक्की मोठमोठ्याने रडत बाहेर आली.

बिग बॉसच्या घरात अशा कृत्याला थारा नाही. बीबीनी तीव्र शब्दात या हिंसेचा निषेध केला आहे. दरम्यान बिग बॉस आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नक्की आणि आर्या काय म्हणाल्या?
आर्याने निक्कीच्या कानाखाली जाळ पेटवल्यानंतर निक्की रडत रडत आणि डोळे पुसद बाहेर आली. सोबतच ती म्हणाली,’बिग बॉस हिने मला मारलंय… आणि मी हे सहन करणार नाही’. त्यानंतर आर्याचं कुठे दाखवलं गेलं आर्या म्हणाली,’मला काही लेन देणं नाही त्या गोष्टीचं… गेली तर जाऊ दे घरी’. असं आर्या ठणकावून म्हणाली.

बिग बॉस आर्याला घराबाहेर काढणार की कठोर शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. बिग बॉस यांचा निर्णय आज रात्री 9 वाजता आपल्याला कळणार आहे. त्याचबरोबर भाऊच्या धक्क्यावर आता कोणते धमाके फुटणार याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे पुढचे चार-पाच दिवस बिग बॉस हा शो प्रेक्षकांसाठी फारच रंजक ठरणार आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi season 5 Aarya Jadhav slaps Nikki Tamboli 13 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x