28 July 2021 6:39 PM
अँप डाउनलोड

इतर राज्याची सुरक्षा हवी आहे | आपलं चंबू गबाळ आवरून आपल्या राज्यात जावं

Shivsena MP Sanjay Raut, Kangana Ranaut

मुंबई, ३१ ऑगस्ट : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर टीका करत आहे. तसेच अनेकांना धारेवर धरलं आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाने आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. यावर संजय राऊत यांनी कंगना खडे बोल सुनावत ‘हा काय तमाशा चालवलाय?’ असा सवाल केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर आरोप करणाऱ्या कंगनाने आता थेट मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची जास्तचं भीती वाटते, असं ट्वीट केलं होतं. ‘मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.’ असं म्हणत तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता.

संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तडतड उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले.

 

News English Summary: Kangana Ranaut, who had demanded protection for her say in the drug case formed against Rhea Chakraborty by the Narcotics Control Bureau (NCB), has now refused to take protection from Mumbai Police. The actress stated that she is more scared of the Mumbai Police than the movie mafia goons.

News English Title: Shiv Sena leader MP Sanjay Raut has criticized actress Kangana Ranaut News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(234)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x