20 April 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विस्तारवाद असा शब्द प्रयोग करत पंतप्रधानांनी चीनचा थेट उल्लेख टाळला

Prime Minister Narendra Modi, China, Expansionism, Leh, Ladakh

नवी दिल्ली, ३ जुलै : तुमचं साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे. तुमचं धैर्य जगाने पाहिलं आहे. तुमच्या त्यागामुळेच आज आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आम्ही पाहात आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याशी संवाद साधला.

भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी शुक्रवारी सकाळी अचानकच लडाखला गेले. तिथे लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. ‘विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,’ अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला.

दरम्यान, १५ जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत भारताचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तर सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमधील तणावही दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या संख्येने सैनिक सीमेवर तैनात झाले आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी सीमेवर दाखल झाले आहेत.

यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लेहमध्ये दाखल होणार, अशी माहिती मिळत होती. मात्र गुरुवारी त्यांच्या या कार्यक्रमात बदल करण्यात आला. त्यावेळी केवळ मुख्य संरक्षण सचिव बिपिन रावत हे लेहमध्ये येणार असे ठरले होते. मात्र त्यांच्यासह आज पंतप्रधानांच्या लेहभेटीने सर्वांना चकित केले आहे.

 

News English Summary: While interacting with military officers and soldiers, Modi gave a direct message about India’s toughness. “Expansionists have been punished for their actions, this is history,” Modi said in a direct statement targeting China.

News English Title: Prime Minister Narendra Modi warn China for expansionism News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x