14 December 2024 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार - पंतप्रधान

PM Narendra Modi, Ladakh, Leh, Indian Army

लेह, ३ जुलै : गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या भारतीय जवानांचीही भेट घेणार आहेत. लेहमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वायूदल, पायदळ आणि इंडो-तिबेट सीमा दलातील (ITBP) सैनिकांची भेट घेतल्याचे समजते.

लडाख सीमारेषेवरील भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे मोदींनी म्हटले.

“जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंचं मानवतेचा विनाश करण्याचं काम केलं. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटलं आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.

 

News English Summary: Today, Prime Minister Narendra Modi suddenly visited the Nimu area of Ladakh and met the soldiers there. After that, the Prime Minister interacted with the jawans and boosted their morale.

News English Title: Prime Minister Narendra Modi Visited Ladakh Nimu Speaks With Solders Warns Chine Border Tension News Latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x