17 May 2021 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

सेना रमली पालघर पोटनिवडणुकीत, तर मनसेने शेतकऱ्यांच्या जागेची मोजणी बंद पाडली

पालघर : पालघर जिल्ह्यात संदर्भात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. एकीकडे शिवसेना पालघर पोटनिवडणुकीकडे व्यस्त झाली असून त्यासाठी मातोश्रीवर विशेष बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे त्याच पालघर मधील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावत त्यांचे मोजणीचे मशीन सुद्धा फेकून दिले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज ठाकरेंच्या ठाम भूमिकेनंतर आणि स्थानिकांच्या बाजूने उभे राहण्याचे आदेश येताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी जागेची मोजणी सुरु होती जी मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आक्रमक आंदोलन केलं असून त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले.

विशेष म्हणजे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जमिनीच्या मोजणीसाठी अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता, तरी आक्रमक कार्यकार्त्यांनी झुगारून आंदोलन केलं. जवळ जवळ १०० ते १५० मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी वातावरणात तणाव निर्माण झाला आणि सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जमीन मोजणी त्वरित थांबवा अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांचा विरोध डावलून जर सरकारने शेतकऱ्यांवर जबरदस्ती केल्यास मनसेकडून अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावत, त्यांचे जमीन मोजणीचे मशीन सुद्धा फेकून दिले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x